Happy Daughters Day 2023 Wishes: भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये, मुलींची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना समान सन्मान आणि अधिकार देण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी राष्ट्रीय कन्या दिन म्हणजेच 'राष्ट्रीय कन्या दिवस' साजरा केला जातो. मुलींना शिक्षण, जीवन कौशल्ये आणि खेळांमध्ये सहभाग यासह समान संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत याची आठवण करून देणे हे यामागील उद्दीष्ट आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जागतिक कन्या दिन साजरा केला जातो. युनायटेड स्टेट्समध्ये दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर शेअर करुन तुम्ही लाडक्या लेकीचा दिवस खास करू शकता.
एक तरी मुलगी असावी,
कळी उमलताना पाहता यावी,
मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लेक असते ईश्वराचं देणं,
तिच्या पाऊलखुणांनी सुखी होईल आमचं जिणं.
जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा!
स्वागत तुझे मी असे करावे,
अचंबित हे सारे जग व्हावे,
तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे.
जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा!
माझा श्वास तू,
माझा जीव तू,
माझ्या जगण्यासाचा अर्थ तू
माझी लाडकी छकुली
कन्या दिनाच्या शुभेच्छा!
लेक म्हणजे आनंदाचा झरा,
लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा
जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा!
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)