Dnyaneshwari Jayanti 2022 Wishes: महाराष्ट्राला महान संतांची परंपरा लाभलेली आहे. यापैकी एक महान संत म्हणजे संत ज्ञानेश्वर होय. वयाच्या 21 व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली आणि अल्प आयुष्यात त्यांनी केलेले काम आज जगाला प्रेरणा देत आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीमद्भगवद्गीताचे रूपांतरण मराठी भाषेत केले. ऐतिहासिक नोंदींनुसार, संत ज्ञानेश्वरांनी भगवत गीतेमधील बोध जनसामान्यांपर्यंत पोहचावा म्हणून रसाळ आणि मराठी भाषेत त्याची निर्मिती केली. त्याला श्रीज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हणून ओळखल जात. ही प्रक्रिया पूर्ण झाली तो दिवस भाद्रपद वद्य षष्ठी चा होता. त्यामुळे वारकरी बांधव दरवर्षी भाद्रपद वद्य षष्ठीला ज्ञानेश्वरी जयंती साजरी करतात. दरम्यान अनेकांनी ज्ञानेश्वरी जयंतीच्या शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या आहेत.
पाहा
श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा. pic.twitter.com/oBR2JIHOXh
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) September 16, 2022
🕉️🚩
रामकृष्णहरी 🚩
जय श्रीराम 🚩
श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
🙏💐🚩🇮🇳🕉️🇮🇳🚩💐🙏 pic.twitter.com/7GbFdT7cie
— विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत (@VHPPaschimMHA) September 16, 2022
वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक श्री संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांनी 'ज्ञानेश्वरी' च्या माध्यमातून संस्कृत भाषेतील भगवद्गीता प्राकृत भाषेत आणली आणि सर्वसामान्य माणसांना जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. 'श्री ज्ञानेश्वरी' ग्रंथ जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !#ज्ञानेश्वरी_जयंती pic.twitter.com/tyi6URm3qb
— Prashant Shitole (@shitoleprashant) September 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)