Viral Video: उत्तराखंड येथील हरिद्वार परिसरातील न्यायालयाच्या गेट जवळ जंगली हत्ती घुसला. [Poll ID="null" title="undefined"] न्यायालयाच्या आवारात जंगली हत्ती घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. हरिद्वारच्या रोशनाबाद परिसरातील जिल्हा आणि सत्र न्यायालयात ही घटना घडली. जंगली हत्तीमुळे परिसरात मोठी दहशत उडाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे हत्ती गेट तोडून आत प्रवेश करत आहे. स्थानिकावर मध्ये घबराट निर्माण झाली आहे. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राण्याला घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला आणि तो राजाजी व्याघ्र प्रकल्पाकडे वळवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)