Madya Pradesh Shocker:  मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात सोमवारी एका ऑन ड्युटी शिक्षकाला त्याच्या मुलाच्या 10 बोर्डाच्या परिक्षेची उत्तरपत्रिका बदलताना पकडण्यात आले आहे. दमोह येथील या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सिंगरामपूर येथील राणी दुर्गावती उच्च माध्यमिक विद्यालयात ही घटना घडली आहे. या घटनेची तात्काळ कारवाई करत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी महिला शिक्षकासह अन्य तीन निरिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. महिला शिक्षकांनी सोडवलेली उत्तरपत्रिका बदलण्याचा प्रयत्न करत असताना तीला रंगेहात पकडले. महिलेची तत्कार करण्यात आली. ही घटना सोमवारी घडली जेव्हा 10बोर्डाचा इंग्रजी पेपर होता. अंजली राय असं शिक्षकाचे नाव आहे. तीने उत्तर पत्रिका घरातून सोडवून आणली होती. एका मुलाने शिक्षकाच्या हाती उत्तर पत्रिका पाहिली होती त्याने या घटनेची माहिती उपस्थित पोलिसांना दिली. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)