MSBSHSE Class 12 Exam 2019: मुंबई, कोकण, पुणे, नागपूर अशा महाराष्ट्रभारातील विविध शिक्षण विभागांमध्ये उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारी 2019 पासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. बारावीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा आणि परिक्षेच्या काळात नेमक्या कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं? यंदापासून कोणते नवे नियम असतील याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडून यंदा कॉपीचे प्रकार आटोक्यात ठेवण्यासाठी यंत्रणा अधिक सुसज्ज ठेवली जाईल याबाबत माहिती दिली जाईल. PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा बारावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिक्षेच्या दरम्यान कोणत्या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचे आहे?
-
विद्यार्थ्यांनी परिक्षा स्थळावर किमान अर्धा तास पोहचणं गरजेचं आहे. 10th & 12th Board Exam 2019: BEST देणार SSC, HSC च्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात मोफत प्रवास करण्याची मुभा
- मोबाईल, टॅबलेट्स किंवा इतर कोणतेही उपकरण, गॅजेट्स परिक्षा केंद्रावर घेऊन जाण्यास मज्जाव आहे.
- जर विद्यार्थी कॉपी करताना सापडल्यास त्याला पुढील कोणत्याच विषयाची परीक्षा देण्याची संधी मिळणार नाही.
- महाराष्ट्रात दहावी, बारावीचया परीक्षेच्या काळात अनेक कॉपीची प्रकरणं समोर येतात. यामध्ये काही भागात हमखास कॉपी पुरवली जाते. अशा परीक्षा केंद्रांवर खास व्हिडिओग्राफी केली जाणार आहे.
- यंदा परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे. कॉपीची शक्यता आणि इतिहास लक्षात घेता विविध झोनमध्ये त्याची विभागणी करण्यात आली आहे. ज्या शाळेत सीसीटीव्ही सुविधा आहे तेथेच कॅमेर्याच्या माध्यामातून नियंत्रण ठेवता येईल. बोर्ड स्वतः नवीन कॅमेरे बसवणार नाही.
- परीक्षेच्या वेळेआधी 15 मिनिटं विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका आणि त्यानंतर प्रश्नपत्रिका दिली जाईल.
- अनुचित प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात सेक्शन 144 लागू करता येऊ शकतो. याकरिता संबंधित शाळांना जिल्हास्तरीय अधिकार्याशी बोलून परवानगी घेण्याची सोय देण्यात आली आहे.
- ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आलेले अॅडमिट कार्ड घेऊन जाणं अनिवार्य आहे.
सकाळी 11 ते 2 आणि 3 ते 6 या दोन टप्प्यांमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. 30-40 हजार तज्ञ आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीच्या कामामध्ये मदत करणार आहेत.