SSC, HSC Board Exam Students: बारावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. तर 1 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरु होईल. त्यामुळेच दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्टने (BEST) एक विशेष सुविधा सुरु केली आहे. या सुविधेअंतर्गत दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा बारावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक
ही सुविधा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च पर्यंत बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर 1 ते 22 मार्च दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु असेल. (CBSE Board Examination 2019:बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून होणार सुरू)
ज्या विद्यार्थ्यांचा घरापासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी पास असेल त्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी वेगळे तिकीटे घ्यावे लागणार नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परीक्षा काळात बसच्या पुढच्या बाजूने चढण्याची मुभा देण्यात आली आहे. गर्दी-गोंधळ टाळावा, हा यामागील उद्देश आहे.
विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांकडे बसचा पास नसला तरी त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.