![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/10/ssc-exam-380x214.png)
CBSE 10 and 12 th Board Examination 2019 Date Sheet: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) च्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासुन सुरू होणार आहेत. 15 फेब्रुवारी ते 3 एप्रिल या काळात बारावीच्या परीक्षा पार पडतील. तर सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 29 मार्च या काळात पार पडणार आहेत. सीबीएसईच्या ऑफिशिएल वेबसाईटवर ( cbse.nic.in) परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यंदा बोर्डाने परीक्षेचं अंतिम वेळापत्रक 7आठवडे आधी जाहीर केलं आहे.
बोर्डाची परीक्षा सकाळी 10.30 ते दु.1.30 या वेळेत होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान अर्धातास आधी म्हणजे सकाळी 10 वाजता हजर रहाणं बंधनकारक आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी -
10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला पेपर 7 मार्च दिवशी 'गणित' या विषयाचा असेल. त्याआधी ऑप्शनल विषयांची परिक्षा होणार आहे.
![10th Time Table](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/12/101.jpg)
![CBSE Class X Date Sheet](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/12/fgfdf.jpg)
![CBSE Class X Date Sheet](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/12/103.jpg)
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी -
12 वीची परीक्षा कॉमर्स, सायन्स, आर्ट्स नुसार होणार वेगवेगळ्या विषयाने सुरू होणार आहे.
![CBSE Class XII Date Sheet](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/12/121.jpg)
![CBSE Class XII Date Sheet](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/12/122.jpg)
![CBSE Class XII Date Sheet](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/12/123.jpg)
![CBSE Class XII Date Sheet](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/12/124.jpg)
![CBSE Class XII Date Sheet](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/12/125.jpg)
इतर कोणत्याही प्रवेश परीक्षांसोबत दहावी, बारावीच्या परीक्षा एकाचदिवशी येणार नाही याची खात्री केल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलेले आहे. या परीक्षांचे निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावले जातील.