Telangana News:  तेलंगणातील एररावल्ली गावाजवळ एका खासगी बसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ PTIने प्रसारित केले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे बसला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आग आटोक्यात आल्यानंतर बस संपुर्ण जळालेल्या स्थितीत दिसून येत आहे. जखमींना कर्नुल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)