लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर काल एनडीए च्या झालेल्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची निवड एनडीए चे नेते म्हणून करण्यात आली. येत्या 8 जूनला ते पंतप्रधान म्हणून तिसर्यांदा शपथबद्ध होण्याच्या तयारी मध्ये आहेत. अशात त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. भारतीय वंशाचे आणि यूके चे पंतप्रधान ऋषि सुनक, इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह अनेक राष्ट्राध्याक्षांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर बांग्लादेश आणि नेपाळचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी देखील लावणार आहेत. कॅनडा आणि भारता मध्ये तणावग्रस्त संबंध असतानाही PM Trudeau यांच्याकडून अभिनंदनाचा संदेश आला आहे.
जगातल्या प्रमुख नेत्यांकडून सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री @narendramodi यांचं अभिनंदन.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष #जोबायडन यांनी प्रधानमंत्र्यांसह एनडीएचं अभिनंदन करुन दोन्ही देशातले मैत्रीपूर्ण संबंध आणखी वृद्धिंगत होतील असं शुभेच्छा संदेशात म्हटलं.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) June 6, 2024
Prime Minister Narendra Modi congratulates Mexico's newly elected President Claudia Sheinbaum, tweets, "Congratulations to Claudia Sheinbaum, Mexico's first woman President-elect! This is a momentous occasion for the people of Mexico and a tribute to the great leadership of… pic.twitter.com/YX5HoJlZt7
— ANI (@ANI) June 6, 2024
Today I spoke to @narendramodi to congratulate him on his election victory.
The UK and India share the closest of friendships, and together that friendship will continue to thrive.
ब्रिटेन और भारत के बीच करीबी मित्रता है, और साथ मिलकर यह मित्रता आगे बढ़ती रहेगी।
🇬🇧🇮🇳
— Rishi Sunak (@RishiSunak) June 5, 2024
Congratulations to Prime Minister Narendra Modi and the National Democratic Alliance on their victory, and the nearly 650 million voters in this historic election.
The friendship between our nations is only growing as we unlock a shared future of unlimited potential.
— President Biden (@POTUS) June 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)