नॅशनल हेराल्ड (National) प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना  ED कडून नव्याने समन्स बजावण्यात आला आहे. या समन्सनुसार सोनिया गांधी यांना 26 जुलै रोजी  ईडी चौकशीसाठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. त्याचं पार्श्वभुमिवर कॉंग्रेसने (Congress) देशभरात शांततापूर्ण 'सत्याग्रह' करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच कॉंग्रेसमधील सर्व खासदार, AICC महासचिव आणि CWC सदस्यांना दिल्लीत (Delhi) होणाऱ्या सत्याग्रहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी सोनिया गांधींना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावला होता. पण त्यावेळी सोनिया गांधींना कोरोना (Corona) झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)