छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या उत्तरेच्या तिन्ही राज्यात भाजपा आघाडीवर असल्याचं चित्र आहे. कॉंग्रेसने उत्तरेतील हातात असलेलं एकमेव छत्तीसगड हे राज्यही गमावल्यानंतर आज Cong Chief Mallikarjun Kharge यांनी आपली प्रतिक्रिया देताना तात्पुरत्या झटक्यांमधून बाहेर पडून पुन्हा INDIA Partners सोबत आता लोकसभेच्या तयारीला लागणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी यावेळी मतदारांचे आभार मानले आहेत. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीची दखल घेतली आहे. पण पुन्हा या राज्यात मेहनत घेतली जाईल असं म्हणत INDIA Partners सोबत आता लोकसभेच्या तयारीला लागणार असल्याचेही त्यांनी ट्वीट मध्ये नमूद केले आहे. INDIA Alliance Meeting: विधानसभा निवडणूक निकालांनंतर आता 'इंडिया' ची पुढील बैठक 6 डिसेंबरला!

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)