Unacademy Layoffs: भारतातील एडटेक क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अनॅकॅडमीने (Unacademy) पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली आहे. आपल्या ताज्या छाटणीत कंपनीने 250 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, सुमारे 100 लोकांना व्यवसाय विकास आणि विपणन यासारख्या मुख्य कार्यांमधून काढून टाकण्यात आले आहे. उर्वरित लोकांना विक्री विभागातून कामावरून कमी करण्यात आले आहे. एडटेक स्टार्टअप्स निधी उभारण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि अशात आता कंपनीने टाळेबंदीचा हा निर्णय घेतला आहे.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘ऑपरेशन सुव्यवस्थित करण्यासाठी आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्याच्या आमच्या चालू प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. परिणामी काही भूमिकांवर परिणाम झाला आहे. हे संक्रमण सोपे नसले तरी, आम्ही या संक्रमणादरम्यान सर्व प्रभावित कर्मचाऱ्यांना समर्थन देऊ.’ लॉकडाऊन दरम्यान एडटेक कंपन्या जागतिक स्तरावर वाढल्या, परंतु शाळांमध्ये ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू होत असल्याने अशा कंपन्यांच्या अडचणी वाढत आहेत. (हेही वाचा: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून उद्या NEET विषयावर संसदेत चर्चेची केली मागणी)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)