बॅंक लुटण्यासाठी काही सशस्त्र दरोडेखोरांनी थेट बॅंकेत हल्ला चढवला. पण बॅंकेच्या मुख्य दारावर बसलेल्या दोन पोलिस हवालदार महिला अधिकाऱ्यांनी या दरोडेखोरांचा हा प्रयत्न हाणून अयशस्वी ठरवला आहे. शस्त्रधारी दरोडेखोरांचा या रणरागिणींनी जिगरीने सामना केला आहे. तरी बॅंकेतील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. बिहारच्या हाजीपूर शहरातील ही घटना असुन या दोन्ही मर्दानी महिला हवालदारांचं बिहार पोलिसांकडून मोठं कौतुक करण्यात आलं आहे. बिहार पोलिसांनी जूही कुमारी आणि शांती कुमारी या दोन्ही महिला हवालदारांना त्यांच्या शौर्याबद्दल बक्षीस दिले.
#WATCH | Two women police constables guarding a bank in Bihar's Hajipur foiled a bank robbery attempt as they fought off three armed robbers.
(CCTV Visuals) pic.twitter.com/7WvGDv6VB5
— ANI (@ANI) January 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)