अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court ) 2017 ला कोर्टाच्या परिसरात असलेली मशीद 'मशीद हाय कोर्ट' ला कोर्टाच्या परिसरातून हटवण्याचा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court Of India) आज या निर्णयाला योग्य ठरवत अलाहाबाद कोर्टाच्या आवारता असलेली मशीद हटवण्यात यावी तसेच वक्फ बोर्डाला पर्यायी जमिनीसाठी राज्य सरकारला विनंती करण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. सदर मशीद 1950 पासून या ठिकाणी असून कोर्टाचा विस्तार करताना तिला हटवण्यात येत असताना तिला असेच हटवू नये अशी बाजू  वक्फ बोर्डाकडून मांडण्यात आली होती. सदर वास्तू कोर्टाच्या परिसरातून तीन महिन्याच्या आत हटवावी अन्यथा तिला हटवण्यात येईल असे देखील कोर्टाने म्हटले आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)