भांडणाच्या वेळी एखाद्या व्यक्तीने समोरच्या पुरुषाचे वृषण जोरात दाबणे याला 'हत्येचा प्रयत्न' म्हणता येणार नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने (एचसी) म्हटले आहे. खालच्या न्यायालयाने 38 वर्षीय आरोपीला एका पुरुषाचे टेस्टिकल्स दाबून त्याला  'गंभीर दुखापत' केल्याबद्दल दोषी ठरवले होते. कनिष्ठ न्यायालयाने दोषीला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली. आता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा कनिष्ठ न्यायालयापेक्षा वेगळा आहे. उच्च न्यायालयाने या आरोपीची शिक्षा देखील तीन वर्षांवर आणली.

उच्च न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, आरोपीचा पीडितेला जीवे मारण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि पीडित पुरुषाला ही दुखापत हाणामारीत झाली आहे. हायकोर्ट म्हणाले, ‘आरोपी आणि तक्रारदार यांच्यात भांडण झाले व त्या भांडणात आरोपीने फिर्यादीचे वृषण दाबले. त्यामुळे आरोपी खून करण्याच्या उद्देशाने किंवा तयारीने आला होता, असे म्हणता येणार नाही. ही घटना 2010 ची आहे. 2012 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने परमेश्वरप्पा याला या प्रकरणी दोषी ठरवले होते. (हेही वाचा:  शिवमोग्गा येथे वैद्यकीय विद्यार्थ्याने भाड्याच्या खोलीत सुरु केली गांजाची शेती; पोलिसांकडून तिघांना अटक, गुन्हा दाखल)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)