जम्मू कश्मीरच्या सांबा भागामध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांवर आज सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन घेण्यात आली आहेत. या भागात काही संशयित हालचाली होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल दक्ष झाले आहे. या भागात लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची देखील मदत घेतली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या हालचाली होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सीमा भागाच्या लगतच्या परिसरामध्ये सध्या सुरक्षा दलाकडून प्रत्येक घराची झाडा झडती केली जात आहे. काही संशयास्पद लोकांच्या हालचालीच्या वृत्तानंतर ऑपरेशन ग्रुपने शुक्रवारी आयबीसह बेन-लालाचक फॉरवर्ड भागात शोध मोहीम सुरू केली, असे त्यांनी सांगितले. मांगुचेक, साडेचेक, रिगल आणि चाहवळसह अनेक गावामध्ये सुरक्षा दलाकडून ही कारवाई सुरू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)