गेल्या काही वर्षात देशात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तरुणांपासून मध्यम वयापर्यंतचे लोक अचानक हृदयविकाराच्या झटक्याला बळी ठरताना आपण पाहिले आहे. तंदुरुस्त लोकांनाही यामुळे जीव गमवावा लागला आहे. आता राजस्थानमधून हृदयविकाराशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया प्रेमराज अरोरा यांचे कोटा येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 42 वर्षीय अरोरा आपले रुटीन काम संपवून बाथरूममध्ये गेले. मात्र अनेक तास उलटूनही ते बाहेर आले नाहीत. ते बराच वेळ बाथरूममधून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून प्रतिसाद आला नाही. त्यानंतर दरवाजा तोडला. दरवाजा तोडला असता आतमध्ये प्रेमराज बेशुद्धावस्थेत आढळून आले. नातेवाइकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रेमराजने 2012-13 मध्ये राजस्थानचा सर्वोत्कृष्ट पॉवर लिफ्टिंगचा पुरस्कार जिंकला होता. 2014 मध्ये नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत प्रेमराज मिस्टर इंडिया ठरला आणि सुवर्णपदक जिंकले. प्रेमराजने 2016-2018 दरम्यान दोनदा मिस्टर राजस्थानचा किताबही जिंकला आहे. (हेही वाचा: हैदराबादमध्ये श्रद्धा हत्याकांडासारखे कृत्य! लिव्ह-इन पार्टनरने कटर मशिनने केले गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचे 6 तुकडे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)