पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे दरम्यान, आज या मतदारसघासाठी सूचनाही जाहीर झाली आहे. या सूचनेमध्ये उमेदवाराला उमेदवारी अर्ज कुठे मिळू शकेल. तो कोणत्या मुदतीत मिळू शकेल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शिवाय उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून तो उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत सर्व माहिती सविस्तर देण्यात आली आहे. ही सुचना आपण खालील ट्विटमध्ये पाहू शकता.
ट्विट
२०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीची सूचना#Chinchwad@DEO_PUNE_ @CEO_Maharashtra pic.twitter.com/BBGcvFiYga
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) January 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)