दिल्लीमध्ये G20 Summit साठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यावरून विरोधक सरकार वर टीकास्त्र डागताना दिसले आहेत. दरम्यान आज सकाळी दिल्लीत पाऊस बरसल्याने प्रगती मैदाना वर उभारलेल्या भारत मंडपम मध्येही पाणी साचल्याचं समोर आलं. सोशल मीडीयामध्ये या पाणी साचल्याच्या घटनेचे काही व्हिडिओ, फोटोज वायरल होत आहेत आणि कोट्यावधी खर्च  करूनही गैरसोयच? अशा आशयाचं ट्वीट समोर आले आहेत. पण PIB ने त्यावर खुलासा करताना अशी वृत्त 'दिशाभूल' करणारी असल्याचं म्हटलं आहे. काही काळ पाणी होतं पण पंप लावून त्याचा निचरा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पहा ट्वीटस

पीआयबी चा खुलासा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)