पाकिस्तानने आरएस पुरा सेक्टरमध्ये युद्धविरामाचे उल्लंघन करत आंतरराष्ट्रीय सीमेवर बेछूट गोळीबार सुरू केला. रात्री 8 वाजता अरनिया भागातील बीएसएफच्या चौक्यांवर पाकिस्तान रेंजर्सनी बेछूट गोळीबार सुरू केला ज्याला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. वृत्तानुसार गोळीबार अजूनही सुरू आहे. जम्मू-काश्मीरच्या अरनिया सेक्टरमधील सर्व सहा सीमा चौक्यांवर दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू आहे. दहशतवादी घुसखोरीच्या भीतीमुळे सीमा सुरक्षा दल पाकिस्तानी रेंजर्सना चोख प्रत्युत्तर देत आहे. संपूर्ण सीमेवर हाय अलर्ट ठेवण्यात आला आहे. सीमा सुरक्षा दलाने निवासी भागातील वीज बंद करण्याचे आदेश दिले असून लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे. बीएसएफने याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा: Pakistan On Immigrants: 'स्थलांतरीतांनो देश सोडा', पाकिस्तान सरकारचा इशारा, 1 नोव्हेंबरपर्यंत जागा खाली करण्याचे आदेश)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)