लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने बुधवारी मार्च 2023 च्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 5 पटीने वाढ नोंदवली. कंपनीच्या नियामक फाइलिंग अहवालात म्हटले आहे की हा नफा 13,191 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 2,409 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. अशाप्रकारे आर्थिक वर्ष 2022-23 साठी कंपनींच्या निव्वळ नफ्यात अनेक पटींनी वाढ होऊन तो 35,997 कोटी रुपये झाला आहे. हा 2021-22 मध्ये केवळ 4,125 कोटी रुपये होता. एलआयसीचा शेअर बीएसईवर 0.61 टक्क्यांच्या वाढीसह 593.55 रुपयांवर बंद झाला. (हेही वाचा: रिटेलर्स ग्रहकांना मोबाईल नंबर देण्याची सक्ती करू शकत नाही - Consumer Affairs Ministry चा ग्राहकांना मोठा दिलासा)
LIC records multi-fold increase in net profit to Rs 35,997 crore for FY 2022-23: Filing
— Press Trust of India (@PTI_News) May 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)