भारतीय आयुर्विमा म्हणजेच एलआयसीने (LIC) शनिवारी रात्री सांगितले की, ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या दुःखद रेल्वे दुर्घटनेत बाधित झालेल्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी क्लेम सेटलमेंटला गती आणली जाईल. दावेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पीडित कुटुंबांचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे एलआयसीच्या निवेदनात म्हटले आहे. पुढील सहाय्यासाठी, दावेदार त्यांच्या जवळच्या शाखा, मंडळ किंवा ग्राहक क्षेत्राशी संपर्क साधू शकतात, असे एलआयसीने सांगितले. त्यात पुढे म्हटले आहे की, ‘दावेकर्ते आमच्या कॉल सेंटर-02268276827 वर देखील कॉल करू शकतात.’

एलआयसी पॉलिसी आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या दावेदारांच्या अडचणी कमी करण्यासाठी कॉर्पोरेशनने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्रांच्या बदल्यात, रेल्वे, पोलीस किंवा कोणत्याही राज्य किंवा केंद्र प्राधिकरणाने प्रकाशित केलेल्या मृतांची यादी मृत्यूचा पुरावा म्हणून स्वीकारली जाईल. (हेही वाचा: पीएम नरेंद्र मोदी यांनी ओडिशा रेल्वे दुर्घटनेत बचाव कार्यात सहभागी लोकांच्या कामाचे केले कौतुक; जागतिक नेत्यांच्या शोकसंदेशांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)