भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही एस आणि पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या (S&P Global Market Intelligence) क्रमवारीत जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी ठरली आहे. ही रँकिंग 2022 मधील कंपन्यांच्या जीवन आणि अपघात आणि आरोग्य विम्याच्या रोख साठ्यावर आधारित आहे. देशातील या सरकारी विमा कंपनीच्या तुलनेत Allianz SE, China Life Insurance आणि Nippon Life Insurance या तीन कंपन्या पुढे आहेत.

एलआयसीचा रोख साठा $503.07 अब्ज होता. तर Allianz SE चा रोख साठा $750.20 अब्ज, China Life Insurance  कंपनीचा रोख साठा $616.90 अब्ज आणि Nippon Life Insurance कंपनीचा रोख साठा $536.80 अब्ज होता. जगातील टॉप 50 जीवन विमा कंपन्यांच्या यादीत 21 कंपन्यांसह युरोपचे वर्चस्व आहे. अमेरिकेत जीवन विमा कंपन्या सर्वाधिक आहेत. आठ विमा कंपन्यांचे मुख्यालय तेथे आहे. यानंतर सात कंपन्यांसह ब्रिटन दुसऱ्या स्थानावर आहे. युरोपीय देशांमध्ये पाच विमा कंपन्यांच्या मुख्यालयांसह मुख्य भूप्रदेश चीन आणि जपान या यादीत अग्रस्थानी आहेत. (हेही वाचा: Bank Employee: बँक कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मिळणार आनंदाची बातमी, सरकार लवकरच घेणार 'हा' मोठा निर्णय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)