कर्नाटक हाय कोर्टाने बलात्काराचे आरोप असलेली एक याचिका फेटाळली आहे. पीडीतेने आरोपीवर 5 वर्षांच्या संबंधांनंतरही लग्न करण्यास नाकारल्याचा दावा केला होता. 'जर दोघं 5 वर्ष एकमेकांच्या प्रेमात आहेत म्हणजे इतक्या मोठ्या काळाचा कालवधी महिलेच्या मनाविरूद्ध गृहीत धरला जाऊ शकत नाही' असं कोर्टाने म्हटलं आहे. तक्रारदाराचे पाच वर्षांपासून प्रेम होते आणि त्यांना लग्न करायचे होते, परंतु जातीच्या मतभेदामुळे ते होऊ शकले नाही. तत्पूर्वी, महिलेने त्या पुरुषाविरुद्ध फौजदारी आरोप दाखल केले होते आणि आरोप केला होता की त्याने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले आणि ते बलात्काराचे ठरले.
पहा ट्वीट
Length Of Relationship Considerable Factor In Rape Case Over False Promise To Marry: Karnataka High Court @plumbermushi #KarnatakaHighCourt #Rape https://t.co/YdKtDwsx8X
— Live Law (@LiveLawIndia) March 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)