मध्य प्रदेश राज्यातील कुनो नॅशनल पार्क (Kuno National Park) येथे आमझाला आहे. ही घटना मंगळवारी (11 जुलै) घडली, अशी माहिती केएनपी (KNP) येथील वन अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे दिली आहे. मृत्यू झालेला चित्ता नर वर्गातील आहे. त्याचे नाव तेजस असे होते. तो याच वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून श्योपूर जिल्ह्यातील केएनपीमध्ये आणला होता.

चित्त्यांनी एकमेकांवर हल्ला केल्याने दोन गटामध्ये झालेल्या भांडणात तेजस चित्ता गंभीर जखमी झाला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असे, मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) वन्यजीव जे एस चौहान यांनी पीटीआयला सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, महत्त्वाकांक्षी चित्ता रीइंट्रोडक्शन प्रोग्रामचा एक भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आलेले चित्ते काही काळ मर्यादीत प्रदेशात बंदीस्त होते. त्यानंतर त्यांना मुक्त करण्यात येणार होते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)