विशेष रसायनांमध्ये जागतिक आघाडीवर असलेली कंपनी लुब्रिझोल आणि आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी यांनी आज गुजरातच्या विलायत येथे 100,000 मेट्रिक-टन सीपीव्हीसी रेझिन प्लांटच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन केले. ग्रासिम इंडस्ट्रीजच्या साइटवर असलेली सुविधा ही जागतिक स्तरावर सीपीव्हीसी रेझिन उत्पादनासाठी सर्वात मोठी सिंगल-साइट क्षमता असेल, जी भारतातील तसेच नेपाळ, बांगलादेश आणि इंडोनेशिया सारख्या शेजारील देशांमधील पाइपिंग ऍप्लिकेशन्ससाठी सीपीव्हीसी मागणी पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. या रेझिन प्लांटमध्ये लुब्रिझोलच्या सर्वात प्रगत सीपीव्हीसी रेझिन उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. रेझिन साइटव्यतिरिक्त, लुब्रिझोल तिच्या दहेज येथील विद्यमान सीपीव्हीसी कंपाऊंड उत्पादनाची क्षमता 70,000MT वरून 140,000MT पर्यंत दुप्पट करत आहे. विलायतमधील रेझिन साइटचा पहिला टप्पा, तसेच दहेजमधील अतिरिक्त लाइन 2025 च्या सुरुवातीला कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. विलायतमधील आगामी प्रकल्प आणि दहेज प्लांटच्या विस्तारामुळे, लुब्रिझोल 4,000 हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करेल अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा: Online Gaming Companies ला India GST Authorities कडून आतापर्यंत 1 लाख कोटींची नोटीस - सूत्र)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)