दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. मंगळवारी विधानसभेत मांडण्यात येणार्‍या दिल्ली सरकारच्या अर्थसंकल्पाला (Delhi Budget 2023) केंद्र सरकारने रोखून धरल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. सीएम केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे की, आतापर्यंत दिल्लीच्या अर्थसंकल्पाला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळालेली नाही आहे. दिल्लीच्या अर्थसंकल्पासाठी केंद्र सरकारची मंजुरी घेणे आवश्यक आहे, त्यानंतरच ते सभागृहात मांडले जाते.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)