दिल्ली येथील उद्योग नगर येथील पीरा गढी परिसरात आज पहाटे एका कारखान्यात भीषण आग लागली. आगीचे स्वरुप रौद्र असून ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण 33 गाड्या घटनास्थळी तैनात आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशनम दलाला यश आले आहे. मात्र, आगीची धक कमी करण्याचे काम अद्यापही सुरु आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. आग पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर घटनेची चौकशी केली जाईल. त्यानंतरच आगीचे नेमके कारण पुढे येऊ शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ट्विट
#WATCH | Delhi: A fire broke out in a factory in the Peera Garhi area of Udyog Nagar early morning today. A total of 33 fire tenders are deployed at the spot. Fire is under control now: Delhi Fire Service
(Source: Delhi Fire Service) pic.twitter.com/0oRz4gQwDZ
— ANI (@ANI) October 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)