कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यातच लॉकडाऊमध्ये कर्नाटकच्या मैसूर येथील परिसरात एका दुचाकीस्वराला पोलिसांनी अडवले असता त्याने त्याच्या बॅगेतून चक्क विषारी कोब्राच बाहेर काढल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सर्पमित्र असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जवळच्या परिसरातून त्याने कोब्रा पकडला असून त्याला जंगलात सोडण्यासाठी तो जात आहे. ट्विट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)