आज भारतीय सीमा सुरक्षा दल आपला 59 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान भारतीय सीमेवर तैनात असतात. परकीय आक्रमणांपासून देशाचं रक्षण करण्याची मोठी जबाबदारी या जवानांवर असते. यंंदा 59 व्या वर्धापन दिनी झारखंडच्या Hazaribagh मध्ये सीमा सुरक्षा दलाकडून हा दिवस साजरा केला जात आहे. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली आहे. दलाच्या दिमाखदार सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी सीमेवर रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. Happy BSF Raising Day 2023 Wishes: बीएसएफ च्या 59 व्या स्थापना दिना निमित्त HD Images, WhatsApp Status, Messages च्या द्वारा जवानांना करा सलाम! 

पहा ट्वीट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)