अयोध्येच्या राम मंदिरात पुढील वर्षी 22 जानेवारीला राम लल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पीएम मोदी यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. बुधवारी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य चंपत राय, नृपेंद्र मिश्रा आणि इतर दोघांनी पीएम मोदींची भेट घेतली आणि त्यांना रामलल्ला प्राणप्रतिष्ठामध्ये सहभागी होण्याची विनंती केली. ट्रस्ट सदस्यांच्या विनंतीवरून पंतप्रधान मोदींनी हे निमंत्रण स्वीकारले आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मान्य केले.
याबाबत पंतप्रधान म्हणतात, ‘आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे. नुकतेच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अधिकारी मला माझ्या निवासस्थानी भेटायला आले होते. त्यांनी मला श्री राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे. आज मला खूप धन्य वाटते. माझ्या आयुष्यात मी या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार होणार हे माझे भाग्य आहे.’ सध्या अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. (हेही वाचा: Mukesh Ambani यांची द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना)
जय सियाराम!
आज का दिन बहुत भावनाओं से भरा हुआ है। अभी श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के पदाधिकारी मुझसे मेरे निवास स्थान पर मिलने आए थे। उन्होंने मुझे श्रीराम मंदिर में प्राण-प्रतिष्ठा के अवसर पर अयोध्या आने के लिए निमंत्रित किया है।
मैं खुद को बहुत धन्य महसूस कर रहा… pic.twitter.com/rc801AraIn
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)