Araria Bridge Collapses Before Inauguration: बिहारमध्ये पुन्हा एकदा पूल दुर्घटना घडली आहे. उद्घाटनापूर्वीच अररिया जिल्ह्यातील एक पूल कोसळून नदीत बुडाला. अररिया जिल्ह्यातील सिक्टी ब्लॉकमध्ये ही घटना घडली. येथे बाकरा नदीच्या पडरिया घाटावर 12 कोटी रुपये खर्चून पूल बांधण्यात येत होता. अचानक या पुलाचा काही भाग नदीत बुडाला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. पुलाच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप लोक करत आहेत, त्यामुळे उद्घाटनापूर्वीच पूल कोसळला. अररियाचे खासदार व आमदार यांनी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत भाष्य केले आहे. हा पूल बांधण्यासाठी भाजपचे स्थानिक आमदार विजयकुमार मंडल आणि खासदार प्रदीपकुमार सिंह यांनी प्रयत्न केले होते. यापूर्वी हा पूल बांधण्यात आला तेव्हा पुरामुळे नदीचे पात्र मोठे झाले. त्यानंतर 12 कोटी रुपये खर्चून नदीपात्रापर्यंत पुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. परंतु विभागातील लोकांनी लक्ष न दिल्याने ठेकेदाराने योग्य काम केले नाही. त्यामुळे मंगळवारी हा पूल कोसळला. (हेही वाचा: Delhi Water Crisis: दिल्लीत टँकर दिसल्यावर मारामारी, नागरिकांची पाण्यासाठी वणवण)
पहा व्हिडिओ-
बिहार के अररिया में नदी के ऊपर बना पुल उदघाटन से पहले ही गिर गया !! pic.twitter.com/yi21P9OICF
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) June 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)