Delhi Water Crisis

Delhi Water Crisis: दिल्लीतील जनतेला पाण्याच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत आहे. भीषण उष्मा आणि उष्णतेच्या लाटेने त्रस्त असलेल्या दिल्लीत लोक पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, टँकरही पुरेसा पाणीपुरवठा करू शकत नाही, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. टँकरने पाणी आणण्यासाठीही नागरिकांना कसरत करावी लागत आहे. पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. दिल्लीकरांना संघर्ष करावा लागतो आहे . गीता कॉलनी, ओखला, वसंत विहारसह अनेक भागात पाण्याअभावी जनजीवन कठीण झाले आहे. परिस्थिती अशी आहे की, दिल्लीतील अनेक भागात टँकर दिसताच लोक पाण्यासाठी गर्दी करतात. दिल्लीतून समोर येत असलेल्या दृश्यांवरून समस्येच्या गांभीर्याचा अंदाज येतो.

दिल्लीत पाण्यासाठी संघर्ष

पाणी संकट

दिल्लीत पाण्यासाठी वणवण 

#WATCH | Water supplied through tankers to Delhi locals in the Geeta Colony area, amid water shortage in the national capital this summer pic.twitter.com/Z26VBujmfp

एकीकडे दिल्लीतील जनता पाण्यासाठी प्रत्येक थेंबासाठी झगडत आहे, तर दुसरीकडे नेते राजकारण करत आहेत. भाजपपासून ते काँग्रेसचे नेते दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारला कोंडीत पकडत आहेत आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यात उदासीन असल्याचा आरोप करत आहेत. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीचे दिल्ली सरकार हरियाणातील भाजप सरकारवर पाणी देत ​​नसल्याचा आरोप करत राजकारण करत आहे.