आंध्र प्रदेशातील विझियानगरम (Vizianagaram) जिल्ह्यातील कोठावलसा तालुक्यात अलमांडा-कंटकपल्ली येथे मोठा रेल्वे अपघात झाला आहे. विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. ओव्हरहेड केबल तुटल्याने रायगडा पॅसेंजर ट्रेन रुळावर थांबली. मात्र, त्याचवेळी आलेल्या पलासा एक्स्प्रेसने रायगड गाडीला मागून धडक दिली. परिणामी रायगड पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले आहे. यावेळी घटनास्थळी वीज नसल्याने बचाव कार्यात मोठी अडचण येत आहे. डब्यांमध्ये प्रवाशांची संख्या अधिक असल्याने अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. सर्व जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले. जखमींना नेण्यासाठी पुरेशा संख्येने रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या अपघातामधील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना रु. 50,000 च्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. (हेही वाचा: Kerala Convention Centre Blast: कोचीच्या रहिवाशाने स्वीकारली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटाची जबाबदारी; पोलिसांसमोर आत्मसमर्पण)
#WATCH | Andhra Pradesh train accident: Visuals of the rescue operations.
6 people died and 18 injured in the train accident: Deepika, SP, Vizianagaram. pic.twitter.com/ylThIFkh76
— ANI (@ANI) October 29, 2023
#WATCH | Andhra Pradesh Train accident: "...We are presently focusing on the rescue operation...We are shifting the injured to the nearest hospital. We have also shared the helpline numbers...The numbers are awaited...," says Biswajit Sahu, CPRO, East Coast Railway. pic.twitter.com/ve4TtjoDUs
— ANI (@ANI) October 29, 2023
#WATCH | Andhra Pradesh train accident | Rescue operations underway
6 people died and 18 injured in the Andhra Pradesh train accident: Deepika, SP, Vizianagaram pic.twitter.com/nHYXlC3F2Z
— ANI (@ANI) October 29, 2023
The Prime Minister has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from the PMNRF for the next of kin of each deceased due to the train derailment between Alamanda and Kantakapalle section. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/K9c2cRsePG
— PMO India (@PMOIndia) October 29, 2023
#WATCH | Andhra Pradesh train accident: Waltair Division Railway manager Saurabh Prasad says, "In the middle line we had two passenger trains which were running...The rear train came and overshot the signal as a result of which we had around five coaches, three of the front train… pic.twitter.com/ffBfTh2FKJ
— ANI (@ANI) October 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)