घड्याळात गुरुवार, 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजले असताना, बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुका 2023 च्या एक्झिट पोलच्या निकाल जाहीर झाले आहेत. बहुप्रतिक्षित अशा या निकालांबाबत देशभरातून उत्सुकता व्यक्त होत होती. प्रसारमाध्यमे आणि विविध संस्थांनी मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या पाचही राज्यांचे मतमोजणीपूर्वीचे निष्कर्ष मतदानानंतर जाहीर केले आहेत. जे संभाव्य निवडणूक निकालांबद्दल महत्त्वपूर्ण संकेत देतात.
प्रदीर्घ काळ चाललेली मतदान प्रक्रिया 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत पार पडली. अंतिम निकाल म्हणजेच मतमोजणी रविवारी, 3 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या एक्झिट पोलच्या निकालांचे महत्त्व सर्वोपरि आहेत. कारण ते विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालांची झलक दर्शवतात. अर्थात सर्वच एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरतात असे नाही. पण आजवर बहुतांश वेळा हे निकाल जवळपास निवडणूक निकालाच्या जवळपास पोहोचले आहे. आपण ABP News वरील एक्झिट पोल्सचे लाईव्ह स्ट्रिमिंग येथे पाहू शकता.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)