जयपूरमधील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कर्धनी पोलिस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल मनोज कुमार यांनी सांगितले की, योगेश सिंग असे मृताचे नाव असून तो 9वीत शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश शनिवारी (19 डिसेंबर) सकाळी शाळेत पोहोचला होता, तो त्याच्या वर्गात जात होता, त्याच दरम्यान त्याची प्रकृती खालावली आणि तो खाली पडला. योगेश पडल्याची माहिती मिळताच शाळेतील शिक्षकांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले.खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलाला सवाई मानसिंग रुग्णालयात रेफर केले. तेथे पोहोचल्यावर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)