Murder in MahaKumbh 2025: महाकुंभ 2025 (Maha Kumbh 2025) मध्ये एक धक्कादायक घटना घडली. दिल्लीतील अशोक वाल्मिकी नावाच्या व्यक्तीने एका लॉजमध्ये त्याची पत्नी मीनाक्षीची हत्या केल्याची घटना घडली. 19 फेब्रुवारी रोजी बाथरूममध्ये तिचा मृतदेह आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, अशोकचे विवाहबाह्य संबंध होते. ज्यामुळे त्याचे पत्नीशी वारंवार भांडणे होत होती. मीनाक्षीने त्याच्या विवाहबाह्य नात्याला विरोध केला आणि महाकुंभ दरम्यान, अशोकने तिची हत्या केली. आपण पकडे जाऊ नये यासाठी ती हरवल्याचे सांगितले. पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार करण्याची त्याची सुरुवातीची योजना होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पत्नीची हत्या

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)