Monkey Attacks Woman: उत्तर प्रदेशमधील झाशी (Jhansi)येथील सिटी कार्ट मॉलमध्ये एका माकडाने एका महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. मकडाने (Monkey Attack)एकदा नव्हेतर तीन ते चारवेळा महिलेवर हल्ला केला. तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी माकडाला हूसकावण्याचा प्रयत्न केला. माकडाने महिलेचा पिछा सोडला नाही. माकडाने महिलेचा बूट हिसकावून घेतला. तिचे केस ओढले. महिलेचा चावा घेतला. माकडाने महिलेच्या डोक्यावर उडी मारल्याचे व्हिडीओत दिसत आहे. दुकानदारांनी माकडाला केळीने आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला आणि घाबरलेल्या महिलेला उभे राहण्याचा सल्ला दिला, परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. चिकाटीने वागणाऱ्या माकडाने वारंवार तिच्यावर हल्ला केला आणि नंतर कापडी रॅकवर उडी मारली नागरिकांनी त्याला ब्लँकेटने रोखण्याचा अनेक प्रयत्न केला. मात्पर, तोही निष्फळ ठरला.
केस ओढले, चावा घेतला, बूट हिसकावून घेतला
झांसी के मॉल में बंदर ने मचाया उत्पात...
एक युवती को जमकर किया परेशान
चीखती नजर आई युवती,वीडियो हुआ वायरल#Jhansi #UPNews #ViralVideo pic.twitter.com/efQRvkLDTu
— News1India (@News1IndiaTweet) January 11, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)