First Bullet Train Terminal Video: भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन (First Bullet Train Terminal) तयार झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी गुरुवारी अहमदाबादमधील साबरमतीच्या मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हबमध्ये बांधल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन टर्मिनल (Bullet Train Terminal) चा व्हिडिओ शेअर केला. अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बुलेट ट्रेन स्टेशनच्या बांधकामादरम्यान सांस्कृतिक वारश्यासह आधुनिक वास्तुकलाची काळजी घेण्यात आली आहे. साबरमतीत बांधण्यात आलेल्या बुलेट ट्रेन स्टेशनमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणार आहे. जपानच्या मदतीने हे स्टेशन तयार केले जात आहे. आर्थिक मदतीसोबतच जपानकडून तांत्रिक मदतही मिळत आहे. बुलेट ट्रेनने अहमदाबाद ते मुंबई हा प्रवास अवघ्या 2.07 तासात पूर्ण केला जाऊ शकतो. ट्रेनचा कमाल वेग ताशी 350 किमी असेल. (हेही वाचा - Bullet Train Project: भारतात बुलेट ट्रेन सेवा कधी सुरू होणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला खुलासा)
Terminal for India's first bullet train!
📍Sabarmati multimodal transport hub, Ahmedabad pic.twitter.com/HGeoBETz9x
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)