Murder Caught on Camera in Delhi: दिल्लीतील 28 वर्षीय जिम मालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुमित चौधरी असं जीम मालकाचे नाव आहे. 10 जुलै रोजी भजनापूर येथील गमरी एक्स्टेंशन येथील त्यांच्या घराबाहेर ही घटना घडली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, सुमित मित्रासोबत बसलेला असताना त्याच्या जवळ हल्लेखोर येत आहे. हल्लेखोरांनी अनेक वेळा त्यांच्या पोटात चाकूने वार केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमितच्या अंगावर 21 हून अधिक जखमा सापडल्या. या घटनेनंतर पोलिसांनी सुमितच्या हल्लेखोराला अटक केले आहे. या आधी सुमितला पोलिसांनी हत्ये प्रकरणात अटक केले होते. (हेही वाचा- स्वत: चा जीव धोक्यात घालून जवानांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणीनेचे प्राण, अहमदाबाद येथील घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)