Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील बैरिया परिसरात सुधर छपरा मोडजवळ कार आणि पिकअपमध्ये जोरदार धडक झाली आहे. या अपघातात एकूण 6जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 9 जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये दोन मुलांचा देखील समावेश आहे. बलियाचे एसपी देव रंजन वर्मा यांनी माध्यमांना सांगितले आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे 3.30 च्या सुमारास झाला. कारमधील प्रवाशी एका लग्न समारंभातून घरी परतत होते. मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा- माजी मुख्यमंत्री तेजेस्वी यादव यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात)
#WATCH | Uttar Pradesh: Ballia SP, Dev Ranjan Verma says "Six people died and several others were injured in an accident between two cars and a pickup truck at around 3-3:30 am under Ballia's Bairiya police station area. The victims were returning from a function. The injured… pic.twitter.com/7wyuaVaQ2U
— ANI (@ANI) February 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)