सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बोरीवली मुंबई या कार्यालयात 1 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी केले आहे.
या योजनेकरिता महाविद्यालय, विद्यापीठ प्रवेश, अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय प्रवेशाच्या माहिती पत्रकामध्ये तसेच इतर महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या पदवी व पदव्युत्तर असणाऱ्या इच्छुक अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींनी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती देणे या योजनेकरिता विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बोरीवली, मुंबई या कार्यालयास 1 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावा,असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
परदेशात शिक्षणासाठी #शिष्यवृत्ती बाबत अनुसूचित जमातीच्या इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १ जून २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बोरीवली, मुंबई येथील प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. pic.twitter.com/n57ogb66un
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)