नुकतेच राज्यातील बारावीचा निकाल जाहीर झाला आता प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात हा निकाल लागू शकतो. विद्यार्थी http://mahresult.nic.in वर त्यांचे गुण पाहू शकतात. राज्यातील विनाअुनदानीत शाळांच्या शिक्षकांनी या आधी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची चिंता व्यक्त केली जात होती. परंतु जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले होते.
#maharashtrasscresult2022 may be announced in next few days, students can check their marks @ https://t.co/GsR6HGprA3
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) June 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)