Assam Fire: आसाममधील देमाजी येथील जोनाई मिगोम डोलुंग भागात एका गोदामाला आग लागली. मंगळवारी सकाळी आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग आटोक्यात येईपर्यंत गोदामात असलेली लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली होती. सध्या अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी उपस्थित असून आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
#WATCH | Assam: Fire breaks out at a godown & properties worth several lakh rupees gutted in fire at Jonai Migom Dolung area in Demaji. Fire tenders are present at the spot. Further details are awaited. pic.twitter.com/NbNnV80bui
— ANI (@ANI) December 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)