स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं (Azadi Ka Amrit Mohotsav) 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अभियानात प्रत्येकांनी सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलं आहे. 13 ते 15 ऑगस्ट या काळात आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवा, यामुळे राष्ट्रीय ध्वजासोबत असलेलं आपलं नातं अधिक दृढ होईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहे. तसेच वसाहतवादी राजवटीशी लढताना ज्यांनी स्वतंत्र भारताच्या ध्वजाचं स्वप्न पाहिलं त्या सर्वांचं अतुलनीय धैर्य आणि प्रयत्न आज आम्हाला आठवतात. त्या स्वातंत्र्य चळवळीतल्या सैनिकांच्या स्वप्नातल्या भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं राबवण्यात येणाऱ्या या विशेष अभियानानिमित्त ग्रामिण भागातील अनेक नागरिक उत्सुक आहेत.
Tweet
-स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात 'हर घर तिरंगा' या अभियानात सहभागी होण्याचं पंतप्रधान @narendramodi यांचं आवाहन.
- १३ ते १५ ऑगस्ट या काळात आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवा, यामुळे राष्ट्रीय ध्वजासोबत असलेलं आपलं नातं अधिक दृढ होईल-पंतप्रधान. @PMOIndia @DDNewslive pic.twitter.com/wTEgFiddBT
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)