Commonwealth Youth Games 2023: कॉमनवेल्थ युथ गेम्सची 7 वी आवृत्ती पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे 4 ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत, 14-18 वर्षे वयोगटातील 1000 हून अधिक खेळाडू आणि पॅरा ऍथलीट 500 हून अधिक अधिकाऱ्यांद्वारे व्यवस्थापित केलेल्या सात खेळांमध्ये सहभागी होतील. दरम्यान, भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ओडिशा RF ऍथलेटिक्स HPC ऍथलीट बापी हंसदा त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल युवा खेळ 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती राज्य क्रीडा विभागाने दिली. एप्रिलमध्ये, बापी हंसदाने ताश्कंद, उझबेकिस्तान येथे झालेल्या आशियाई अंडर-18 अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुषांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले होते. यूथ कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपमधील मुलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत भारताचे हे पहिले रौप्य पदक होते. (हे देखील वाचा: Commonwealth Youth Games 2023: मिठाई विक्रेत्याचा मुलगा कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये भारताची वाढवणार शान, जाणून घ्या कोण आहे तो)
Bapi Hansda, the talented #Odisha RF Athletics HPC athlete, is all set to participate at the #CommonwealthYouthGames 2023 in Trinidad and Tobago from 4 to 11 August, 2023: State Sports Department pic.twitter.com/nPRUW03Sy2
— Argus News (@ArgusNews_in) July 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)