Supriya Sule Birthday: खासदार सुप्रिया सुळे यांचे आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आवाहन, घ्या जाणून

खासदार सुप्रिया सुळे उद्या म्हणजेच 30 जून रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

Supriya Sule Birthday: खासदार सुप्रिया सुळे यांचे आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आवाहन, घ्या जाणून
Supriya Sule | (Photo Credit: Archived, edited, representative images)

खासदार सुप्रिया सुळे उद्या म्हणजेच 30 जून रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. सुप्रिया सुळे म्हणतात, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्यांना माझ्याप्रती असणारा जिव्हाळा व आस्था नेहमीच व्यक्त होत असते. उद्या माझ्या वाढदिवसानिमित्तही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक प्रत्यक्ष भेटून आपल्या शुभेच्छा मला देण्यासाठी उत्सुक आहेत याची मला जाणीव आहे. आपणां सर्वांना मी एकच नम्र आवाहन करू इच्छिते की शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू आदींचे वाटप करावे. या सामाजिक उपक्रमाचे फोटो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावेत, मी ते माझ्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करेन. आपला पक्ष हा नेहमीच आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपत आला आहे. आपण हा गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रमही नेहमीच्याच तत्परतेने राबवावा, माझ्यासाठी वाढदिवसाची हीच अनमोल भेट ठरेल.' (हेही वाचा: Opposition Meet: विरोधी पक्षांची बैठक शिमल्याऐवजी बंगळुरूमध्ये पार पडणार; 13 आणि 14 जुलै रोजी होणार विचारमंथन)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2023 09:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).