Opposition Meet: विरोधी पक्षांच्या नेत्यांची पुढील बैठक 13 आणि 14 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पुढील बैठक शिमल्यात होणार असल्याचे निश्चित करण्यात आले. विरोधी एकजुटीच्या सर्वसाधारण सभेत सर्व प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन 2024 ची निवडणूक लढण्याचे मान्य केले आहे. देशातील विरोधी ऐक्याला धार देण्याच्या उद्देशाने 23 जून रोजी पाटणा येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मात्र, बैठकीतून फारसे काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर विरोधी पक्षांची पुढची बैठक शिमल्यात होणार असे ठरले. त्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत ही बैठक आता शिमल्याऐवजी 13 आणि 14 जुलैला बेंगळुरूमध्ये होणार असल्याची माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत देशातील केंद्र सरकारवर निशाणा साधताना पवार म्हणाले की, पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी अस्वस्थ आहेत. (हेही वाचा - Devendra Fadnavis On Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे बॉस आहेत, आमच्यात सर्व काही ठीक आहे; देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण)
Next meeting of opposition parties to be held in Bengaluru on July 13-14: NCP chief Sharad Pawar
— Press Trust of India (@PTI_News) June 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)