Mirzapur 3 Teaser: मिर्झापूर 3 च्या (Mirzapur Season 3)निर्मात्यांनी टीझरचे अनावरण केले. प्रतिशोधाच्या भावनेने भरलेल्या एका रोमांचक प्रवासासाठी स्वत:ला तयार असे कॅप्शन देत हा टिधर रिलीज झाला आहे. अली फझल त्याच्या शक्तिशाली गुड्डूच्या भूमिकेदिसणार आहे. या सीझनमध्ये मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा) दिसणार नाहीत. कारण गेल्या सीझनमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय, कलेन भैय्या (पंकज त्रिपाठी) यांच्या गंभीर दुखापतीने प्रेक्षकांना वेठीस धरले होते. 'मिर्झापूर सीझन 3' हा 5 जुलैपासून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मागील काही महिन्यांपासून चाहत्यांचे रिलीज डेटकडे लक्ष लागले होते. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), अली फजल (Ali Fazal), रसिका दुग्गल (Rasika Dugal), विजय वर्मा (Vijay Verma), श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi) आदी तगडी स्टारकास्ट आहे. (हेही वाचा:Vaani Kapoor Workout Video: वाणी कपूरने वर्कआउट व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना फिटनेसबद्दल केले जागरुक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)