Prajakta Mali Buy New Farm House: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत एक खूशखबरी शेअर केली आहे. प्राजक्ताने आपलं स्वप्न साकार झाल्याचं म्हटलं आहे. प्राजक्ताने कर्जतमध्ये फार्म हाऊस खरेदी केलं आहे. या पोस्टला कॅप्शन देताना तिने म्हटलं आहे की, 'डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे,एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं. नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज” (१- प्राजक्तप्रभा २- प्राजक्तराज ३- प्राजक्तकुंज प्राजक्तत्रयी पुर्ण.) खानदानातली सर्वात सुंदर property, खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत.. फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)